Marleshwar Temple Maral
रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर देवरूख नगरापासून 17 किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे. मारळ गावाजवळील मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र . मारळचा देव म्हणजेच मारळ + ईश्वर असे मार्लेश्वर नाव झाले. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे.पावसाळ्यात पडणारा धबधबा ,थंडगार वाहणारा वारा , हिरवीगार वनराई आणि आजूबाजूचा निसर्ग हाही हृदयात साठवण्या सारखा असतो. माघ महिन्यात ह्या धबधब्याखाली आंघोळ करणे हे खूप पवित्र समजले जाते. डोंगराच्या पायथ्यापर्यंत वाहनांसाठी रस्ता असून मार्लेश्वर देवस्थानापर्यंत जाण्यासाठी सुमारे ५०० पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराच्या गुहेमध्ये समयांचा प्रकाश असतो . मार्ग. मार्लेश्वरला जाण्यासाठी साखरपा, देवरुख तसेच रत्नागिरीहून राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या आहेत.
Marleshwar Temple Maral